भुसावळ येथे गाजली राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराजांची सत्यवाणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

 भुसावळ येथील तक्षशिला बुद्ध विहार , तक्षशिला नगर वरणगाव रोड  येथे दिनांक ३० मे २०२३ रोजी  छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या जन्म महोत्सवानिमित्त राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशन, तसेच तक्षशिला नगर रहिवासी रमा रत्न महिला मंडळ तक्षशिला नगर, भीम ज्योत मंडळ, गोलानी परिसर भुसावळ, प्रागतिक विचार मंच भुसावळ, त्रिरत्न बुद्ध विहार निंभोरा व सर्व ग्रामस्थ मंडळी भुसावळच्या वतीने सत्यपालजी महाराज यांचा प्रबोधनाचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केले होते.[ads id="ads1"] 

   सुरुवातीला महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष रिपाई , कार्यक्रमाचे उद्घाटक मुकुंद भाऊ सपकाळे प्रदेशाध्यक्ष क्रांती मोर्चा, कार्यक्रमाचे स्वागतउत्सुक विनोद भाऊ सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दीप पूजा , राजूभाऊ सवर्णे माजी सरपंच निभोरासीम,यांच्या हस्ते तर धूपपुजा अ.फ.भालेराव ज्येष्ठ साहित्यिक, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव ,जिल्हा सचिव सुमंगल अहिरे बाळा सोनवणे समाजसेवक, प्रकाश सरदार,जय वराडे समाजसेवक बोदवड, विशाल सोयके समाजसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"] 

राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष  दिपरत्न तायडे, सचिव अश्वीनी तायडे,यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी  कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशनचे सचिव अश्वीनी तायडे यांनी मांडली व कार्यक्रमाचे उद्घाटक मुकुंद भाऊ सपकाळे प्रदेशाध्यक्ष क्रांती मोर्चा यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुभाऊ सुर्ववंशी यांनी अध्यक्ष भाषणांत आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. व सत्यपालजी महाराज यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्या-याचा मान्यवरांचा पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला.व लागलीच सत्यपाल मराराजांचाी सत्यवाणी  समाजप्रबोधनाच्या कीर्तनाला सुरुवात झाली. त्यात त्यांनी संतांचे विचार मांडून फुले, शाहू,आंबेडकर यांनी समाजाला काय योगदान  दिले.जातीयता भेदभाव कसा नष्ट केला.बहुजनांना शिक्षणाचे व्दारे खुली करुन  दिली, महिलांचे अधिकार माणसाला माणुसपण आणून देण्यासाठी काय परिश्रम घेतले बुवाबाजी अंधश्रध्दा जादूटोणा हे सारे थोटांग असून वैज्ञानिक दृष्टीकोन सांगून महापुरुषांचे विचार आपल्या कीर्तनातून मांडून प्रबोधन केले. 

हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

     सदरच्या कार्यक्रमाला भुसावळ, रावेर,मुक्ताईनगर ,बोदवड,जामनेर,यावल,जळगांव, यांच्यासह  जिल्हयातुन बहुसंख्येने नागरिक सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. संस्थेचे अध्यक्ष  दिपरत्न तायडे, सचिव अश्विनी तायडे, वतसेच तक्षशिला नगर रहिवासी रमा रत्न महिला मंडळ तक्षशिला नगर, भीम ज्योत मंडळ, गोलानी परिसर भुसावळ, प्रागतिक विचार मंच भुसावळ, त्रिरत्न बुद्ध विहार निंभोरा व सर्व ग्रामस्थ मंडळी  यांनी खुप परिश्रम घेऊन आयोजित केला होता. 

 कार्यक्रमाला यांची होती प्रमुख उपस्थिती

 केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, ग्रामसेवक प्रशांत तायडे, सुनिल मेढे सर, नागेश्वर साळवे, विकी तायडे, अनमोदर्शी तायडेसर,फुले,शाहु , आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, प्रवज्जा  फाऊंडेशनचे अध्यक्ष सारीपुत्र गाढे, भिमस्टार फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक इंगळे, सुवर्ण दिप न्युज चे मुख्य संपादक राहुल डी.गाढे,सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे,समता सैनिक दल एस.पी.जोहरे, नंदाताई लोखंडे, प्रतिभा मोरे, विलास अवसरमल,ॲङ प्रविण इंगळे,यांच्यासह असंख्ये मान्यवर मोठयासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगीनदास इंगळेसर यांनी तर आभार राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशन अध्यक्ष दिपरत्न तायडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!