भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तथागत गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले,राजेश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांनी प्रेरित होऊन जळगाव जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक धार्मिक व राजकीय कार्य गेल्या अनेक वर्षापासून अविरत करीत आहात त्याबद्दल रावेर येथील शाहू,फुले, आंबेडकर बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने मनस्वी अभिनंदन तसेच पुढील जीवनातील ध्येयासाठी कोटी कोटी मंगल कामना देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[ads id="ads1"]
आपण चालविलेले कार्य अभिनंदन पात्र आहे या कार्याच्या यशाने हुरळून न जाता जीवनामध्ये आपण प्रगती करून हिमालयाच्या उंचीला लाजवेल असे यश संपादन करून आपल्या ज्ञानाचा अनमोल ठेवा समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक व राजकीय विचार समाजाच्या तळागळातील माणसापर्यंत पोचवून या महामानवांचे भीषण मिशन पूर्ण करून त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहून समाज परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होऊ याच अपेक्षेसह पुनश्च अभिनंदन करून यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.[ads id="ads2"]
सदरील पुरस्कार हा माझे नेते माझे प्रेरणास्थान जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी यांचे प्रेरणेने व आशीर्वादाने तसेच त्यांचेच मार्गदर्शनाने मिळालेला आहे,कारण त्याचेमुळेच मला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते सदरील पुरस्कार हा समाजातील जबाबदारी वाढवणारा असून यापुढे जास्त जोमाने समाजासाठी व चळवळीसाठी यापुढे काम करत राहणार असे रिपाई तालुकाध्यक्ष विकी तायडे यांनी आपले मनोगत मांडले.
हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना
सदरील पुरस्कार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध खंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी राजू भाऊ सूर्यवंशी,मुकुंद भाऊ सपकाळे,मुकुंद सोनवणे ,राजू सवर्णे ,उमेश गाढे, नगिन इंगळे सर,विविध राजकीय,सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.




