रावेर येथे बौद्ध समाजाचा विवाह सोहळा संपन्न : ४५ जोडपी झाले विवाह बद्ध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथे बौद्ध धर्मातील ४५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी (ता. १४) उत्साहात संपन्न झाला. येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या रंगमंचावर फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पूज्य भंते दिपंकरजी महाथेरो व ३५ श्रामणेर संघ व मान्यवरांच्या  उपस्थितीत हा सोहळा झाला.[ads id="ads2"] 

सर्वप्रथम गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक विवाह सोहळ्यास सुरवात झाली.  यांनी त्रिशरण पंचशील, परित्राण पाठ, जय मंगल अष्टगाथा घेण्यात आाले .प्रतिज्ञा देऊन विवाहांचे सोपस्कर पार पाडले. [ads id="ads1"] 

विवाहास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष  शैलेंद्र जाधव, महा सचिव सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी ४५ उपासक, उपासिका यांचे विवाहाचे सोपस्कर पार पडले .कार्यक्रमाची अध्यक्ष दीप रत्न तायडे होते तर उद्घाटक एपीआय  गौतम तायडे यांच्या हस्ते करण्यात आले . दीप व धुप पूजा अधीक्षक सिटीसर्व्हे राजू घेटे, प्रा .संदीप धापसे,प्रा .चतुर गाढे, समता सैनिक जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे, केंद्रीय शिक्षक ए.टी सुरळकर ,समाज कल्याण विभागाच्या शिला अडकमोल  मॅडम, प्रकाश सरदार, विश्वनाथ मोरे, केंद्रीय शिक्षीका लता तायडे,वैशालीताई सरदार, प्रियंका अहिरे,अश्विनी तायडे आदिंच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

    जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जळगाव, तसेच बुलढाणा, खामगाव, मलकापूर आदी ठिकाणच्या ४५ वधू- वर सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

   यावेळी जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, अँड पी टी झाल्टे, दिलीप कांबळे,अँड योगेश गजरे, राजु सवर्णे, बाळू शिरतुरे,  जगदीश घेटे, प्रविण डांगे, डी डी वाणी, प्रकाश महाले, एकनाथ गाढे, विकी तायडे, साहेबराव वानखेडे, प्रदीप सपकाळे , सदाशिव निकम, उमेश गाढे, दिपक इंगळे, सारिपुत्र गाढे, दिलीप पोहेकर, रघुनाथ कोंघे, ज्ञानेश्वर अटकाळे, राहुल डी.गाढे, धनराज घेटे यशवंतराव कोंघे, अनिल घेटे,संगीता अटकाळे, आदी उपस्थित होते.प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विवाह समिती अध्यक्ष राजेंद्र अटकळे यांनी केले.सुत्रसंचलन केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल  तर आभार संघरत्न दामोदरे  यांनी  मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!