लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र ( रजि) च्या सिंदखेड़ राजा तालुका अध्यक्ष पदी शिंदी च्या मिनाताई बेलोड़े यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सिंदखेड राजा (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

महाराष्ट्रभर प्रचलित असलेल्या विविध पारंपारिक लोककला,त्यांचे जतन, संवर्धन,संशोधन, सादरिकरण करणारे लोककलावन्त यांचे राज्यव्यापी लोककलावंतांचे संगठन म्हणजे लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान,महाराष्ट्र या  संघठनेच्या  सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी सरपंच सौ मिनाताई मधुकर बेलोडे  यांची निवड पुणे येथील राज्य कार्यकारणी च्या मार्गदर्शनात राज्य महिला समन्वयक सौ सुनीता खरात यांनी नियुक्ति पत्र देऊन  करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

सौ मिनाताई बेलोडे  ह्या  माऊली महिला बचत गट् ,महिला भजनी मंडल द्वारे व्यसनमुक्ति अभियान ,  बळीराजा सामाजिक संस्था, शिंदी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक समस्या व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाचा प्रचार व प्रासार करीत आहेत.  विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजक म्हणून जनमानसात   परिचित आहेत.संत नगरी श्रीक्षेत्र शेगाव च्या संत गजानन महाराज संस्थान च्या सेवाधारी प्रकल्प उपक्रमात महिला प्रमुख म्हणून अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम भजन, कीर्तन, भारुंड, गोंधळ,ई मनोरंजन व प्रबोधन जनजागृती कार्यक्रम आयोजनात पुढाकार असतो व  बळीराजा संस्थे च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रबोधनात्मक प्रचार प्रसाराचे कार्य करित आहेत.[ads id="ads2"] 

  तसेच ते शासनाच्या लोककलावन्त मानधन योजनेचे पात्र कलावन्त यांना लाभ मिळवून देणारी मार्गदर्शक जिल्हा कलावन्त संस्था महामानव लोककला अकादमी,बुलडाणा च्या आजीव सदस्य आहेत.

लोककलेच्या बद्दल ची आवड़ व व्यासंग् लक्षात घेऊन लोककलावन्त प्रबोधन प्रतिष्ठान,महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष शाहिर डी आर इंगले यांचे शिफ़ारशिने लोककलावन्त प्रबोधन प्रतिष्ठान, महाराष्ट्र  चे संस्थापक अध्यक्ष  शाहिर सम्राट सुभाष गोरे,(सोलापुर), संस्थापक सचिव शाहिर बालासाहेब मालुसकर(पुणे) राज्य कार्याध्यक्ष शाहिर डी आर इंगले(बुलडाणा) राज्य महिला समन्वयक  सौ सुनीता रामेश्वर खरात यांनी सौ मिनाताई मधुकर बेलोडे यांची सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष महिला विंग  म्हणून निवड केली आहे,सौ मिनाताई बेलोडे यांना सम्पूर्ण सिंदखेड़ राजा तालुक्यात गाँवोगावी महिला लोककलावंताना संघठित करून गावनिहाय कार्यकारणी गठित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे.

सदर महत्वपूर्ण सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे सौ मिनाताई मधुकर बेलोडे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे....