भुसावळ प्रतिनिधी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन येत्या २८ में रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे, रिपाई च्या या महआधिवेसानात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असे अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.[ads id="ads1"]
त्या निमित्ताने आज दिनांक:- २० में रोजी, आर.पी.आय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी यांच्या कार्यालयात संपूर्ण जळगांव जिल्हा युनिट मधील विभागाची मीटिंग बोलवण्यात आली असता,राजू भाऊ सुर्यवंशी यांनी आपल्या प्रत्येक तालुका अध्यक्ष यांना तसेच संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील आर.पी.आय आठवले गटाचे कार्यकर्त्यांना आव्हाहन केले आहे की,सदर कार्यक्रमास आपणास हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचे आहे अश्या प्रकारचे दिशा निर्देश देण्यात आले आहे.[ads id="ads2"]
त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश जी मकासरे यांनी बहु संख्येने जळगांव मधून जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते जाणार आहेत असे सांगितले,तर युवा जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी सुद्धा संपूर्ण युवा वर्गास उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहे,त्याच बरोबर प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी पाच ते सहा हजार कार्यकर्ते येणार असल्याची ग्वाही प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी यांना दिली आहे.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
सदर मीटिंग वेळेस प्रकाश सोनवणे जळगांव जिल्हा सचिव,युवा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम प्रधान,युवा सचिव सुपडू संदानशिव,युवा संघटक डॉली वानखेडे,संजय तायडे बोदवड तालुका अध्यक्ष,विकी तायडे रावेर तालुका अध्यक्ष,विष्णु पारधे यावल तालुका अध्यक्ष, बाळु सोनवणे भुसावळ तालुका अध्यक्ष,सदानंद वाघ,युवराज तायडे,नितीन सुरवाडे, ईसाक चौधरी,सुनील धिवरे,पप्पू सुरडकर,बाबुलाल पटेल तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.