संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने धरणगावात छ.संभाजी राजेंना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव : येथे संभाजी ब्रिगेड (सामाजिक) व मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेड व मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून छ. शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरातील साफसफाई करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भिमराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते किशोर वाणी यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. [ads id="ads1"] 

  तद्नंतर स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, हेमंत माळी, योगेश येवले, प्रथम सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

     याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त करताना म्हटले की, स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते. [ads id="ads2"] 

  छ. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र. त्यांनी शिवरायांनंतर स्वराज्याची तलवार एक हाती पेलली. महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी "बुधभूषणम" नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. राजेंच्या शौर्य आणि ज्ञानाबद्दल भारतात नव्हे तर सकल विश्वातील तरुणाईमध्ये खूप आकर्षण आहे. यावेळी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेतन जाधव, नामदेव मराठे, जितेंद्र पाटील, किशोर पवार, सागर दुर्गे, रुपेश जाधव, चेतन पाटील, गणेश भोई, अरबाज पठाण, प्रफुल्ल मराठे, हेमंत पवार, गोरख देशमुख, पी डी पाटील, यांच्यासह संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश भदाणे यांनी तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!