महात्मा फुले हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत !...

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील

धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १५ जून शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या गेटला फुलांनी सजविण्यात आले, तोरण बांधले. [ads id="ads1"]

  सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार , ज्येष्ठ शिक्षिका पी.आर. सोनवणे व ग्रंथपाल गोपाल पंढरीनाथ महाजन यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. [ads id="ads2"]

  वर्ग ५ वी ते वर्ग ८ वी  पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. वर्ग ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!