जळगाव ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) जळगाव येथील वाघ नगर येथील यशवंत भवन येथे दिनांक १७जून रोजी झालेल्या प्रकाशन सोहळ्यात आनंद ढिवरे लिखित 'मोळी' या कथासंग्रहाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. [ads id="ads1"]
हा कथासंग्रह 'आनंदतीर्थ प्रकाशन' जळगाव मार्फत प्रकाशित करण्यात आलेला आहे. 'हरवलेला काळ' या कवितासंग्रह नंतरचे हे लेखकाचे दुसरे पुस्तक आहे. "मोळी हा गोरगरीब, वंचित आणि शोषित, पीडित या घटकांवर आधारित कथासंग्रह आहे" असे मत भिकाजी कांबळे यांनी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मांडले तर "मोळी हा आजच्या दुर्लक्षित समाजाचे वास्तव चित्रण करणारा कथासंग्रह आहे" असे मत एस.के.भंडारे यांनी मांडले. [ads id="ads2"]
'मोळी या कथासंग्रहात लिहिलेल्या कथा ह्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आलेले अनुभव यांना शब्दबद्ध करून मांडण्यात आलेल्या आहेत' असे मत लेखक आनंद ढिवरे यांनी मांडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल वानखडे आणि के.वाय.सुरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक बी.एस.पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष सपकाळे यांनी केले.




