जळगाव जिल्ह्यातील "या" आमदारावर येत्या 2 दिवसांमध्ये क्रिमिनल फौजदारी गुन्हा दाखल करणार : आमदार एकनाथ खडसे यांचे विधानजळगाव : माजी आ. एकनाथराव खडसे यांच्यावर २०१६ साली बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरील खटला आता सुरु झाला आहे. सोमवारी १९ जून रोजी न्यायालयातील पहिल्या तारखेला फिर्यादी आ. एकनाथराव खडसे हजर झाले. तर, लवकरच खालच्या स्तरावरचे आरोप करणाऱ्या आ. मंगेश चव्हाण यांच्यावरही न्यायालयात खटला दाखल करणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.