नांदगाव - प्रतिनिधी ( मुक्ताराम बागुल ) :- नांदगाव येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक सभागृहाचे शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते दिनांक 30 जून 2023 रोजी शुक्रवारी उद्घाटन संपन्न झाले.
नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातूनह तसेच खासदार केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नांदगाव येथे शिवनेरी शासकीय सभागृह शेजारी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह मीटिंग हॉल बांधण्यात आले आहे. शंभर ते दीडशे लोकांची बैठक होईल असा अद्यावत सुविधा असलेला वातानुकूलित मीटिंग हॉल बांधण्यात आला आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत या हॉलचे उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरणभाऊ देवरे, माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, प्रमोद भाबड, विष्णू निकम सर, राजाभाऊ जगताप, डॉक्टर सुनील तुसे, शिवसेना तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे, बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, बाजार समितीचे माजी सभापती तेजदादा कवडे, उपसभापती पोपट सानप, कैलास पाटील, एकनाथ सदगीर, सतीश बोरसे, बाळकाका कलंत्री, निलेश इप्पर, आनंद कासलीवाल, राजाभाऊ देशमुख, डॉक्टर संजय सांगळे, मयूरभाऊ बोरसे, महेंद्रनाना दुकळे, आबा देवरे, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, रमेश पगार, अण्णासाहेब पगार, भैय्या पगार, डॉक्टर प्रभाकर पवार, डॉक्टर प्रवीण निकम, अंकुश कातकडे, सर्जेराव भाबड, किरण गायकवाड, आप्पा कुनगर, कपिल तेलोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



