अखेर रावेरमध्ये अवैधरित्या धान्यसाठा करणा-या मालकासहित एक जणांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) अमन मित्तल यांनी रावेरमध्ये  अवैध धान्यसाठा करणा-या दोन गोदामांना सिल केल्या नंतर अखेर आज दिनांक १० जून रोजी म्हणजेच तब्बल दहाव्या दिवशी आठ लाखाचा धान्यसाठा केला म्हणून चौधरी ट्रेड्सच्या (Chaudhari Traders)  मालकासहीत एकावर रावेर पोलिसात (Raver Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन धान्यसाठा करणा-यांची झोप उडाली आहे.[ads id="ads1"]

या बाबत सविस्तर वृत्त असे दि ३१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) अमन मित्तल यांनी रावेर शहरातील बुर-हानपुर रोड वरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आल्याने हे गोदाम सिल करण्यात आले होते.मागील दहा दिवसात या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्या नंतर आज दि १० जून रोजी रावेर पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station)  येऊन फिर्याद दिली आहे.[ads id="ads2"]

  यामध्ये आरोपी गणेश देवराम चौधरी  यांच्या  चौधरी ट्रेड्सच्या (Chaudhari Traders) नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला.

• हेही वाचा : डोळ्यामध्ये तिखट टाकून बचत गट कर्मचाऱ्यापासून 67 हजार लुटले : रावेर तालुक्यात "या" ठिकाणी घडली घटना

• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे  4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना

• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा

• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

• हेही वाचा:  रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 यामध्ये ९७ गहु कट्टे २०८ तांदुळाचे कट्टे ११ ज्वारी कट्टे १८० मका कट्टे १७,२५० बारदान आढळले तर आरोपी मो रिहान शेख मोईम (रा नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामा मध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात ८ गहु कट्टे १७ तांदळाचे कट्टे असा एकूण दोघे गोदामा मध्ये आठ लाख ०४ हजार ६५० रुपये कीमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आला म्हणून रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station)  जिवनावश्यक कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!