रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील(Raver Taluka) एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जणाविरोधात मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील(Raver Taluka) सावदा पोलीस स्थानकाच्या(Savda Police Station) हद्दीत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचा दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास व २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घराबाहेर व गावातील बाजारात सतत पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने[ads id="ads2"] संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस (वय २७) याच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात (Savda Police Station) अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.