----------------------------------------------------------
"सदरील व्यापारी संकुल व नगरपालिका दरम्यान फक्त हाकेचा अंतर असताना सुद्धा पालिका प्रशासन अनभिज्ञ राहणे म्हणजे कोणाच्यातरी आशीर्वादाशिवाय असा गंभीर प्रकार गाळेधारक कडून होणे शक्य नव्हते.असे बोलले जात आहे."
-----------------------------------------------------------
[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज व्यपारी संकूलनात एका गाळेधारकांनी पालिका प्रशासनाकडून पुर्वपरवानगी न घेता परस्पर मनमानी पद्धतीने मध्यभागाची संपूर्ण भिंत पडून दोन दुकाने एकत्रित केल्याचा प्रकार घडलेला आहे. [ads id="ads2"]
याबाबत अधिक माहिती अशी की,सावदा नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेले पालिका मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज व्यपारी संकूलनात एका गाळेधारकांनी संबंधित प्रशासनाशी कोणतीच पुर्वपरवानगी न घेता स्वतःचे हित साध्य करण्यासाठी त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने दोन गाळ्यांमधील संपूर्ण अखंड भींत तोडून दोघे गाळे एकत्रित केले असून सध्या येथे वैष्णवी फॅन्सी शॉप व न्यू पांचाली बॅग हाऊस अशी दुकाने थाटलेली आहे.तरी सदरील व्यापारी संकुलन दुमजली असल्या कारणाने या इमारतीच्या संपूर्ण स्ट्रक्चरला मोठा धोका निर्माण केला आहे.सबब संबंधित शासकीय मालमत्तेला जाणून बुजून स्वतःचे हित साध्य करण्यासाठी कधी न भरुन निघणाऱ्या नुकसानाला कारणीभूत गाळेधारक असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देखील करण्यात यावी.याबाब शहरातील काही नागरिकांकडून लवकरच पुराव्यानिशी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केले जाईल.