सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका हद्दीत असलेल्या ताजुशशरिया नगर, रज़ा नगर,पनापिर नगर या भागात लाखो रुपये खर्चून टाकलेली पाण्याची पाइपलाइन असून,या भागातील रहिवाशांना गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती,तरी नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा,या अनुषंगाने येथील समस्या ग्रस्त रहिवास्यांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे तोंडी व लेखी अर्ज करून सुद्धा पाण्याची समस्या जै-थे सारखीच होती.याबबतची माहिती समजली आसता आज दि.१३ जून २०२३ रोजी सदरील टंचाई ग्रस्त भागात जावून रहिवाशांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच वेळी समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान,फरीद शेख,युसूफ शाह सह शिष्टमंडळाने सावदा पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे सदरील समस्याचे निवेदन दिले,असता यावर तात्काळ काहीतरी योग्य तो मार्ग काढावा या तळमळीने यशस्वी अशी चर्चा सुरू असताना या दरम्यान माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदरील समस्या समाजसेवक सोहेल खान यांनी कळवली असता,त्यांनी तात्काळ समस्यावर समाधान शोधून थेट डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक डॉ.हाजी हारुन शेख इक्बाल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांची पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व राजेश वानखेडे यांच्या केलेल्या विनंतीला मान देऊन आपली स्वतःची कुपनलिका समस्याग्रस्त भागाला जोडण्याच्या आश्वासन दिले.यानंतर समाजसेवक सोहेल खान,सह शिष्टमंडळ आणि पालिकेचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अवि पाटील,प्रवीण पाटील,इत्यादीने समक्ष भेट घेतली असता असे डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक डॉ.हाजी हारून सेठ यांनी(जल विना जीवन नाही)या म्हणीनुसार सदरील समस्या सुटावी म्हणून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदरील भागात पाणी देण्यास तत्परता दाखवली.यावेळी शेख नाजीम, शेख अब्बास,इब्राहिम बारी सह नागरिक उपस्थित होते.तरी अशा घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सतत तीन महिन्यापासून जटिल अशी पाण्याची समस्या सुटल्यामुळे स्थानिक समस्याग्रस्त रहिवास्यानी माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे,डॉ.हाजी हारून शेठ व समाजसेवक सोहेल खान,युसूफ शाह,फरीद शेख यांचे आभार व्यक्त केले.