यावल (सुरेश पाटील) यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांचा हस्ते आज शनिवार दि.10 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
त्यानिमित्त सामुदायिक रित्या ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसपक्षा तर्फे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यानिमित्ताने तालुक्यात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्षम बनविण्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्यासाठी तसेच सभासद नोदणी,बुथ सक्षमीकरण करणे,जनतेचे हितसंबंध जोपासणे,लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित करणे जनसामान्यांसाठी कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.[ads id="ads2"]
यावेळी प्रा.मुकेश येवले,विजय पाटील,डी.के.पाटील, देवकांत पाटील,अन्वर खाटीक महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा नीळ,डॉ.हेमंत येवले,अय्युबखान मोहसीन खान,अरूण लोखंडे,बापु जासुद,विनोद पाटील कासवे,आबिद कच्ची,राहुल चौधरी,पितांबर महाजन,राजु करांडे,गुणवंत नीळ,भगवान बर्डे,चंद्रकांत पाचपोळ किशोर माळी,वसंत पाटील, समाधान पाटील,किरण पाटील,नितीन शिंदे,राकेश सोनार,ऊसमानभाई,शे नसीरपेंटर,निलेश बेलदार इत्यादी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे 4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण