फिरोज तडवी (प्रतिनिधी)
जळगाव इंडियन मेडीकल असोसिएशन आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आज डॉ. केतकी हॉल येथे हेल्थकेअर कॉनक्लेव्ह अर्थात राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषद उत्साहात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांची उपस्थिती होती.[ads id="ads1"]
डॉ.असोकन यांच्यासमवेत व्यासपीठावर जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आयएमए सचिव डॉ. तुषार बेंडाळे, जळगाव आयएमएचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आयएमए हेड क्वॉटरचे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, आयएमए हेड क्वॉटरचे उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, महाराष्ट्र आयएमचे अध्यक्ष रवींद्र कुटे, आयएमए महाराष्ट्र सचिव डॉ. संतोष कदम, सहसचिव डॉ भरत बोरोले, डॉ. मंगेश पाटे, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. संतोष कुळकर्णी, महाराष्ट्र आयएमए (इले)अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, आयएमए एमएसएन महाराष्ट्रचे डॉ. अजय साहा,[ads id="ads2"] आयएमए एमएसएल महाराष्ट्र चेअरमन डॉ. शिव जोशी, डॉ. वसंत लुंजे, नाशिक आयएमएच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली कदम, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ.सुहास बोरले, डॉ.सुहास पिंगळे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. लोंढे, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास वाघ, पीएसएम विभाग प्रमुख डॉ.दिलीप ढेकळे आदी मान्यवर उपस्थित होते.



