जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. २७ रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यावर येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कापसाला सहा हजार रूपये अनुदान द्यावे, केळी उत्पादकांना मदत द्यावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.[ads id="ads1"]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी दि. २७ रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. या पाश्र्वभूमीवर आ. खडसे यांनी पत्रकार परीषद घेतली. आ. खडसे म्हणाले की, शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर येत असल्याचा उद्देश चांगला आहे. मात्र जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात कापूस अजूनही पडून आहे. [ads id="ads2"]
कांद्यालाही हमीभाव नाही. केळी उत्पादक शेतर्कयांना केळीवरील सीएमव्ही रोगापोटी अद्याप मदत मिळालेली नाही. या सर्व समस्या कायम आहेत. मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रूपये अनुदान द्यावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस दि. २७ रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवतील अशी माहिती आ. खडसे यांनी दिली.
तसेच जिल्हयात पाणीपुरवठा मंत्री असतांना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाणी टंचाई असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. यावेळी पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील, रायुकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्षा मंगला पाटील, एजाज मलिक उपस्थित होते.