पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा;काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग प्रदेश सचिव राजुभाऊ सवर्णे यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.एकीकडे एस सी समाजावर दिवसेंदिवस अन्याय - अत्याचार वाढत असून हे रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी पडत आहेत ते देशाचे नव्हे तर एका पक्षाचे पंतप्रधान असल्याची भावना निर्माण झाल्याचे काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती प्रदेश सचिव राजुभाऊ सवर्णे यांनी व्यक्त केली आहे.देशात अनेक ठिकाणी एस सी समाजातील लोकांवर हल्ले होत आहेत.आणि ते हल्ले रोखण्यात भाजपाचे पंतप्रधान अयशस्वी ठरले आहेत.एखाद्या चित्रपटातल्या कलाकाराने शिंकले तरी मोदी हे लवकर बरा हो असे ट्विट करतात पण त्यांना हे हल्ले व अत्याचार दिसत नाहीत. भिमआर्मी प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राजुभाऊ सवर्णे यांनी निषेध व्यक्त केला आहे.केंद्र व उत्तरप्रदेश राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही त्यांना अद्यापही सुरक्षा पुरवली नसल्यानेच हा हल्ला झाला आहे.चंद्रशेखर आझाद हे सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत नाही ते त्यांच्या सावधगिरीने बचावले आहेत.सरकारने त्यांना तात्काळ सुरक्षा पोहचवण्याचीहि मागणी काँग्रेस कमेटीचे प्रदेश सचिव राजुभाऊ सवर्णे यांनी केली आहे.भारताचे पंतप्रधान यांचा भाजपाचे पंतप्रधान म्हणुन उल्लेख करत राजुभाऊ सवर्णे यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!