सह आरोपी न करण्याच्या मोबदल्यात लाच घेतांना भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचेसह तिघे जण एसीबीच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ : बायोडिझेलच्या दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रूपयांची लाच घेतांना भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्यासह रायटर आणि खासगी पंटर यांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार आणि त्याच्या मित्रावर भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर पकडून बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे ५ लाखांची बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी मागणी केली. [ads id="ads2"] 

  तडजोडी अंती ३ लाख रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार धुळे पथकाने मंगळवारी १८ जुलै रोजी सापळा रचला.

हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..

 त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला रा. हनुमान वाडी, भुसावळ यांने तक्रारदारकडून ३ लाख रूपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी केली.याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!