फैजपूर नगरपरिषदेला कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलक यांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


फैजपुर प्रतिनिधी  तालुका यावल (सलीम पिंजारी)

शहरातील नागरिक व इतर सामाजिक कार्यकर्ते, फैजपूर नागरपरिषदेस गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी बदली होऊन गेल्या पासुन् आज तगायत कोणतीही मुख्याधिकारी नेमणूक झालेली नाही असे निवेदन फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलक यांना देण्यात आले,  शहरातील आणि शहरच्या हद्दी बाहेरील सर्व नागरिकांना नागरपरिषदे कडून नागरिकांच्या मूलभूत सुविधा  मिळत नसल्याने सर्व सुविधा पासुन् जन सामान्य नागरिक वंचित होत आहे. [ads id="ads1"]

  • फैजपूर नागरपरिषदेस कायम स्वरूपी ( पूर्ण वेळ) मुख्याधिकारी का मिळत नाही? 
  • प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी थांबण्यास का तयार नाही? 
  • या मागे राजकीय दडप शाही तर नाही न....
  • शहरच्या विकासाच्या कामकाजाच्या भ्रष्टाचारामुळे की कुणाच्या दबाव तंत्रा ला कंटाळून अधिकारी टीकट नाही? 

शहराच्या सर्वांगणी विकास न व्हावा या साठी तर प्रशासनाला दावणीला बांधून ठेवणे असा तर काही राजकीय लोकांचा डाव किवा हेतु तर नाही न ? [ads id="ads2"]

              शहरातील  सर्व भागात पाणी पुरावठा नियमित आणि योग्य रीतीने होत नसल्याने नागरिकांन मधे संतापाची लाट दिसून येत आहे. ऐन पावसाळ्यात गटारी, नाले सफ़सफ़ाई n झाल्याने संपूर्ण शहराला घाणीचे साम्राज्य  चे स्वरूप आले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, याला जबाबदर कोण राहिल? 

                प्रशासकीय अधिकारी नसल्याने सामान्य जनतेला कार्यालयीन कामकाजात दिरंगाई व अडथळे होत आहे. नागरिकांच्या समस्या चे निवारण होत नसल्याने शहर वासियांन मधे संताप व जन आक्रोश निर्माण होत आहे. 

                 त्या मुळे फैजपूर नागरपरिषदेस कायम स्वरूपी ( पूर्ण मुख्याधिकारी असे निवेदन प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना देण्यात आले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!