यावल येथील राजीव गांधी फाउंडेशन विकास संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  (सुरेश पाटील) भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निश्चित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवार दि.7 जुलै 2023 रोजी येथील माजी नगरसेवक तथा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विजयकुमार गजरे संचलित राजीव गांधी फाउंडेशन विकास संस्थेतर्फे दलित वंचित,आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब,गरजू शालेय विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"] 

       येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या आवारात विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेवक विजयकुमार गजरे यांनी केले,उपस्थित मान्यवरांनी थोर पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ केला या स्तुत्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल- रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मधुकर कारखान्याचे माजी चेअरमन शरददादा महाजन, इंटक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील,[ads id="ads2"] साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांच्या उपस्थितीत सरस्वती विद्यामंदिर मुख्याध्यापक पाठक,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पी.एस.सोनवणे सर वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण, गटशिक्षण अधिकारी धनके डॉ. युवराज चौधरी,आकाश कोळी, दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष मोहन सोनार,मिलिंद रेस्टॉरंटचे संचालक खाचणे,महिला पत्रकार बेबाबाई धनगर यांच्या उपस्थितीत आणि यांच्या शुभहस्ते इयत्ता 5 वी ते 11 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दलित शोषित,वंचित,आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के.बाऊस्कर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर अरुण गजरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!