ना. गुलाबराव पाटील, व आमदार सुरेश भोळे यांच्या शुभहस्ते श्री वेद महर्षी भगवान व्यास महाराजांची महापूजा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


श्री व्यास पौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी

यावल (सुरेश पाटील) गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा निमित्ताने श्री वेद महर्षी भगवान व्यास महाराजांची महापूजा,दुग्धाभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम सोमवार दि.3जुलै रोजी सकाळी 8 वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील व आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्या शुभहस्ते व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत होणार आहे श्री व्यासपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी यावल येथील श्री व्यास मंदिरात श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थांन तर्फे करण्यात आली आहे.

         सकाळी 8 ते 10 वाजेच्या दरम्यान महापूजा व दुग्धाभिषेक त्यानंतर सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप केला जाईल.या उत्सव प्रसंगी ज्या भाविकांना महाप्रसादासाठी धान्य / जिर्णोद्धारासाठी रोख रक्कम देणगी स्वरूपात सढळ हाताने मदत करावयाची असेल त्यांनी व्यास मंदिर संस्थान यावलचे कार्यालयात देऊन रीतसर पावती घ्यावी, किंवा मनीऑर्डर,चेक ड्रॉपने, 'फोन पे' ने संस्थानचे नावावर पाठवावी तसेच एक किंवा एखादी स्वतंत्र व्यक्ती येऊन श्री महर्षी व्यासांच्या नावाने देणगी मागत असेल तर  त्याला देणगी अगर धान्य देऊ नका आणि तशी माहिती कृपया संस्थेला कळवावी असे जाहीर आवाहन यावल येथील श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान सुधार समितीने केले आहे. --------------------------------------------  

           ' गुरुपौर्णिमा '

गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे,जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू,जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो.

        आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात.या दिवशी गुरूंची पुजा केली जाते.संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत होते आणि आजही ती परंपरा कायम आहे.

        चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना चारही वेदाचे ज्ञान दिले.ते आपले आद्यगुरू आहेत.त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते.म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे. अशा श्री वेद महर्षी व्यासांनी यावल येथे महाभारताची काही पर्वे विघ्नहर्ता श्री गणेश यांच्या शुभहस्ते लिखाण केल्याची आख्यायिका आहे.

------------------------------------------------

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!