रावेर (प्रशांत गाढे) तलाठी भरती प्रक्रिया मध्ये अवाजवी चलन घेतले जात असू त्यात विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळावा या साठी रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील चेतन भालेराव या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे यांना ईमेल द्वारे विनंती केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या नोकरीच्या आशेवर ते शिक्षण घेत आहेत त्यासाठी चलन (शुल्क्) हे मागासवर्गीयांसाठी ९००/- रु. आणि आमागासवर्गीयांसाठी १०००/- एवढे आहे. त्यामध्ये त्यांना ज्याठिकाणी परीक्षा द्यावयायला जावयाचे असते त्याचा अतिरिक्त शुल्क लागतो. त्यामुळे पात्रता असूनही काही युवक/ युवती निव्वळ चलन हे अवाजवी असल्यामुळे अर्ज करण्यासही ते धजावत नाहीत. या आधी सुद्धा वन विभाग भरतीसाठी याच प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे.[ads id="ads1"]
आधीच परिस्थिती हालाखीची असून ग्रामीण भागातील युवक/ युवती रोजंदारी पद्धतीने कामाला जात असून त्यांना रोजी २००/- ते २५०/- रु. इतका एका दिवसाचा रोज मिळतो. त्यामध्ये त्यांना आपला परिवार, शिक्षण, आणि सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात. ग्रामीण भागातील तरुण आपली आर्थिक परिस्थिती हि हालाखीची असूनसुद्धा युवक/ युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. कारण त्यांना फक्त आणि फक्त शिक्षण आणि शिक्षणाच्या अधीन राहून मिळणारा रोजगार हाच एकवेव पर्याय सध्यस्थित आहे. अशी साद घालत सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मोठा दिलास मिळेल अशी आशा बाळगुन आहेत.[ads id="ads2"]
प्रतिक्रिया
सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे यांना ईमेल द्वारे चलन कमी अथवा माफ करण्यासाठी विनंती करावी असे आव्हान चेतन भालेराव यांनी सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केली आहे