यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील चुचाळे येथिल ग्रामपंचायत मधील ग्रामसेविका यांच्या विरोधात दिनांक :-22/06/2023 रोजी पंचायत समिती यावल येथे ग्रामसेविका यांच्या बदली संदर्भात उपोषण केले असतांना चुचाळे येथिल ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी उपोषण कर्ते व गावातील राजकारणात प्रत्येक्ष रित्या सहभाग घेऊन चक्क उपोषण कर्ते यांच्या सोबत उपोषणास पाठिंबा देतांना दिसुन आला त्यामुळे ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांच्यावर कारवाही होणार का अशी चर्चा यावल तालुक्यात केली जात आहे.[ads id="ads1"]
ग्रामपंचायत प्रशासनात असतांना ग्रामपंचायत अधिकारी वर्गाच्या विरोधात जाऊन प्रत्येक्ष पणे उपोषणात सहभाग घेणे.म्हणजे एक प्रकारे तालुक्यातील ग्रामसेवक वर्गासोमोर आवाहन आहे. प्रशासनात काम करीत असताना प्रशासनाच्या अधिकारी वर्गाच्या विरोधात जाने हे कितपत योग्य आहे कोणाच्या आशीर्वादाने चुचाळे येथिल डाटा ऑपरेटर यांनी प्रत्येक्ष रित्या उपोषण कर्ते यांना पाठिंबा देत सहभाग घेतला, पंचायत समिती मधुन त्यांना परवानगी मिळाली होती का ?[ads id="ads2"]
का जळगांव जिल्हातील एका मंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक चुचाळे येथिल ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांचे कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळे डाटा ऑपरेटर यांचे काही होणार नाही म्हणुन त्यानी प्रत्येक्ष रित्या उपोषणात सहभाग घेतला असावा अशीही चर्चा रंगत आहे.ग्रामपंचायत येथिल डाटा ऑपरेटर राजरोस पणे उपोषण करण्याच्या प्रिंट पंचायत समिती मध्ये काढतो प्रिंट काढुन ही दिल्या जातात.प्रशासन यांच्या विरोधात जाऊन काम केले जाते तोवर अधिकारी वर्ग काय करतात. नेमका कोणाचा आशीर्वादाने ऑपरेटर यांनी असे केले यावर पंचायत समिती गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्यातील लक्ष लागून आहे