फैजपूर ते सावदा रस्त्याची परिस्थिती बिकट : लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 फैजपूर ते सावदा रस्त्याची परिस्थिती बिकट


सलीम पिंजारी फैजपुर तालुका यावल प्रतिनिधी

 येथील सार्वजनिक सावदा बांधकाम उप विभागापासून तर धनाजी नाना महाविद्यालयापर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे याला कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झालेला असून सतत वाढत्या  ट्रक्स थांबतअसल्या मुळे  सावदा वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून तसेच सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे.[ads id="ads1"] 

 सावदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागापासून तर धनाजी नाना महाविद्यालया फैजपुर पर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून दररोज या रस्त्याने उभे असलेल्या ट्रक्स आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग असल्याने यारस्त्याने दररोज शेकडो प्रवासी वाहनांची वर्दळ सुरू असते  सावदा ते फैजपूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने या रस्त्याने अनेक अपघात झालेले आहे  सावदा ते फैजपूर प्रमुख्याने धनाजी नाना महाविद्यालयासह अनेक शिक्षण संस्था असून हजारो विद्यार्थी रावेर ते यावल या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करीत आहे.[ads id="ads2"] 

 या रस्त्याने वेगवेगळ्या वाहनाने प्रवास करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना वाहतुकीमुळे अडथळा होत असल्याने जीव मुठीत घेऊन शिक्षणासाठी यावे लागत असून या ठिकाणी दोन्ही बाजूने सतत उभ्या असलेल्या ट्रक्स आणि सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागापासून रस्त्याची या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली असून सावदा येथील वाहतूक पोलीस सतत उभ्या असलेल्या ट्रक्सवरती कारवाई का करीत नाही असा प्रश्न असून तसेच सार्वजनिक उपविभाग यांनी बिकट झालेल्या रस्त्याची दुरुस्ती  करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!