https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

1 महिन्यात दिव्यांगांना सुविधा देण्याचे लेखी आश्वासनानंतर दिव्यांगांच्या लाक्षणिक उपोषणाची सांगता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


1 महिन्यात दिव्यांगांना सुविधा देण्याचे  लेखी आश्वासनानंतर दिव्यांगांच्या लाक्षणिक उपोषणाची सांगता

 यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

        शासन निर्णयानुसार यावल तालुक्यातील दिव्यांगांना सन 2018 ते 2023 या कालावधीतील 5% निधीसह 50% मालमत्ता करातून सुट, दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करणे यासह दि.25 जून 2018 च्या परीपत्रकानुसार सर्व सुविधा पूर्ण करण्याचे पंचायत समिती यावल चे मा.गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दि.15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती, यावल कार्यालयासमोर सुरू केलेले 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण समाप्त करण्यात आले.[ads id="ads1"] 

        या प्रसंगी प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष मा.सुरेशदादा चींधू पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील, जिल्हा सल्लागार राजमल दादा वाघ, उपजिल्हाध्यक्ष मा.दिनेशदादा सैमिरे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष जितेंद्र कोळी माजी नगराध्यक्ष मा.तुकाराम बारी, मा.अभिमन्यू चौधरी, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष नंदुभाऊ सोनवणे, सचिनदादा झाल्टे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष मा.गोकुलभाऊ कोळी, माजी नगरसेवक दिलीप वाणी, विजयकुमार गजरे, प्रहार सेवक मनोज करणकर, योगेश कोळी, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन सोनार,[ads id="ads2"]  राहुल सावखेडकर, प्रदीप माळी, ॲड.गोविंदा बारी, जनार्दन फेगडे, उत्तम कानडे, प्रवीण सोनवणे, नदीम खान, दिलीप आमोदकर, सिकंदर पटेल, हेमचंद्र चौधरी, आश्विन चौधरी, दिनकर चौधरी, अमोल बडगुजर, कुणाल फेगडे, ज्ञानदेव कोळी, भास्कर बारी, प्रदीप पाटील, मंगला बारी, फारुख शेख, देविदास गजरे, दिनकर बारी, पूजा देशमुख, सुखलाल धंजे, प्रवीण डांबरे, चूनिलाल अट्रावलकर सागर गजरे, ज्ञानदेव भालेराव, महेंद्र भोई, सय्यद मुश्ताक, देवेश महाले, बिस्मिल्ला खान, अरुण बारी, इत्यादी यावल शहर व तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव व यावल तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी होते. उपस्थितांचे आभार प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपजिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ सैमीरे व यावल तालुकाध्यक्ष मोहन सोनार यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!