केंद्र सरकारचा स्तुत्य उपक्रम नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद
यावल (सुरेश पाटील)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त राज्यात 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' अभियानाला दि .9 ऑगस्ट 2023 सुरुवात झाली त्यानिमित्ताने यावल नगरपरिषद कर्मचारी यांनी संपूर्ण यावल शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केल्याने संपूर्ण यावल शहरात 'माझी माती माझा देश' घोषवाक्य मोठ्या आधाराने म्हटले जात आहे.[ads id="ads1"]
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे अभियान राबवण्यात येत आहे.आज शुक्रवार दि.११ ऑगस्ट २०२३ सकाळी सकाळी ११ वाजता यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले त्यात प्रामुख्याने संपूर्ण यावल शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती सुद्धा करण्यात आली.यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम व प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग् यांचे मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने,विद्युत अभियंता पांडे, प्रभारी कार्यालय अधीक्षक एस. ए.शेख,प्रभारी आस्थापना लिपिक रवी काटकर,विजय मराठे,बाबुलाल भोई,संतोष नन्वरे,मधू गजरे,रफिक शेख व सर्व नगरपालिका कर्मचारी वृंद. यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू केली असून संपूर्ण यावल शहरात पथनाट्यातून जनजागृती केली.[ads id="ads2"]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा दि.9 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्त संपूर्ण यावल शहरात 'मिट्टी को नमन,वीरों का वंदन' या घोषवाक्यासह देशभर आयोजित 'मेरी माटी - मेरा देश' अर्थात 'माझी माती - माझा देश' या अभियानाची सुरुवात झाली.संपूर्ण राज्यासह देशात ग्रा.पं.तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत.देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ लोकप्रतिनिधी, प्रशासन,लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे.पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन,वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत,गट,शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिला फलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात दि. 09 ते 14 ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सन २०२४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे.गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे.नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे.तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे',ही पंचप्रण (शपथ) सर्व अधिकारी- कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली जाणार आहे.