ऐनपूर महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान व कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपूर महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान व कार्यशाळा संपन्न

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृती  अभियान कार्यशाळेचे उद्घाटन श्री मंडळ अधिकारी श्री शेलकर यांनी केले . व नवमतदारांना मार्गदर्शन केले.  या प्रसंगी बीएलऒ श्री  आशिष सर यांनी मतदार हा देशाचा महत्वाचा घटक आहे,तरुणांनी पुढे येऊन मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी असे प्रतिपादन केले.या प्रसंगी ऐनपूर गावाच्या कोतवाल नयना अवसरमल व पत्रकार अनिल आसेकर हे ही उपस्थित होते. [ads id="ads1"] 

  प्रा. डॉ सतीष वैष्णव यांनी लोकशाहीत मतदान करणे खुप महत्वाचे असते म्हणून सर्वांनी  मतदार यादीत  आपल्या नांवाची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.या प्रसंगी मतदार नोंदणी फॉर्म चे वाटप नवमतदारांना करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एस एन वैष्णव हे होते.[ads id="ads2"] 

  सदर कार्यक्रमाला मा.तहसीलदार श्री बंडू कापसे ,नायब तहसीलदार श्री आर. डी. पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच रावेर तहसील कार्यालयातील कर्मचारी विक्रम राठोड व सुलेमान तडवी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!