दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रज्ञान अवगत करा - भागवत पाटील यांचे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 




ऐनपूर (विनोद हरी कोळी) : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन व्हि पाटील यांनी तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले.सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील केळी तंत्रज्ञान व विस्तार केंद्रामार्फत करण्यात आले. [ads id="ads1"] 

  प्रथम सत्रात आर एन महाजन यांनी दर्जेदार केळी उत्पादनासाठी योग्य शेतीची मशागत केली पाहिजे तसेच वातावरणातील बदलांकडे लक्ष दिले पाहिजे त्यानुसार पिकांची काळजी घेऊन केळी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.दुसऱ्या सत्रात विकास महाजन यांनी दर्जेदार केळी उत्पादनासाठी कुठल्या प्रकारची खते व पेस्टीसाईड वापरावीत  व ती किती प्रमाणात वापरावीत या बाबतीत मार्गदर्शन केले. हिवरखेड्याचे गोपाल पाटील, बलवाडी येथील विनोद पाटील तांदलवाडी येथील बाळु महाजन,भागवत महाजन यांनी आपले अनुभव कथन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.[ads id="ads2"] 

  अध्यक्षिय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार केळी उत्पादन करण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन केळी तंत्रज्ञान व विस्तार केंद्राचे समन्वयक डॉ सतीष पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक डॉ सतीष पाटील, विकास महाजन, पी एम पाटील तसेच प्रा डॉ संजय पाटील, डॉ सतीष वैष्णव, प्रा अक्षय महाजन,प्रा प्रदिप तायडे, शिक्षकेतर कर्मचारी हर्षल पाटील, श्रेयस पाटील, अनिकेत पाटील, गोपाल पाटील, नितीन महाजन, सहदेव पाटील, भास्कर पाटील यांनी मेहनत घेतली. कार्यशाळेत ५५ शेतकरी व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!