यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
तालुक्यातील साकळी येथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने कमी कर्मचारी असतांना कर्मचारी वर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे तरी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पद भरावे अशी मागणी साकळी सह परिसरातून केली जात आहे.[ads id="ads1"]
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत 22 गावे येत असुन त्यात साकळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असतांना सुद्धा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त त्याच बरोबर औषध निर्माण अधिकारी पद रिक्त असे दोन्ही जबाबदारीचे पद रिक्त त्याच बरोबर कर्मचारी कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाला कसरत करावी लागत आहे.[ads id="ads2"]
तरी वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष देऊन लवकरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी पद व औषध निर्माण अधिकारी पद भरून गोरगरीब नागरिकांना योग्य अशी आरोग्य सेवा देता येईल अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.