रावेर (विनोद हरी कोळी) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग,राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी व्यक्तीची ओळख ही त्यांच्या कर्यावरून होत असते. [ads id="ads1"]
बहिणाबाई चौधरी ह्या निरक्षर होत्या परंतु त्यांनी रचलेल्या कविता, ओव्या ह्या काव्यरूपाने प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्या एक महान कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून त्यांच्या नावाने विद्यापीठाचा नाम विस्तार करण्यात आला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. पी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर विस्तारित असा प्रकाश टाकला तसेच स्त्री ही दोन कुटुंबाचा उद्धार करते असे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. [ads id="ads2"]
तसेच कार्यक्रमाचे दुसरे वक्ते प्रा.डॉ.महेंद्र सोनवणे यांनी बहिणाबाई चौधरी या आसोदा या गावच्या राहणाऱ्या असून त्यांना जुन्या जळगाव मध्ये दिलेले होते आपल्या काव्यात त्यांनी निसर्ग प्रतिमा आणि प्रतीक वापरलेले आहे त्या कोणत्याही शाळेत शिकलेल्या नव्हत्या. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. त्यांनी कविता कधीच लिहिल्या नाही. तर सर्व गाणी मनातल्या मनात रचून ओवी या काव्यप्रकाराच्या माध्यमातून शेतामध्ये काम करताना म्हणायच्या लपे करमाची रेखा मन वढाय वढाय सुगरणीच्या खोपा घरोटा अरे संसार संसार यासारख्या कवितांमधून त्यांचे निसर्ग विषयीचे निरीक्षण आपल्याला दिसून येते. भागवत संप्रदायाची तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यातून आपल्याला अभिव्यक्त झालेले दिसून येते. देवा तुझे येणे जाणे सांगे वारा कानामध्ये यासारख्या काव्यपंक्ती त्यांच्या काव्याची महती वैश्विकता स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात एकूणच त्या शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्या कवितांवर बरेच लोक पी.एच.डी. झाले आहेत. म्हणूनच त्यांचा गौरव व्हावा आणि खानदेशातील मातीला न्याय मिळावा म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार 11 ऑगस्ट 2018 मध्ये केला गेला.असे त्यांच्या भाषणा मध्ये सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी.बी पाटील रा से यो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.विनोद रामटेके प्रा. डॉ. रेखा पी. पाटील प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. डी. बी. पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. डॉ. पी. आर. गवळी, श्री हर्षल पाटील व अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.डॉ.विनोद रामटेके विद्यार्थी विकास अधिकारी यांनी मानले. व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.