यावल (सुरेश पाटील) दि.27 रविवार सुट्टीच्या दिवशी तालुक्यातील मनवेल येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर MH-19-P 4244 तलाठी फैजपूर तेजस पाटील व कोतवाल यांनी पकडून तहसील कार्यालय येथे जमा केले.बॅकअप टीम म्हणून तात्काळ मंडळ अधिकारी फैजपूर एम.एच.तडवी,तलाठी M ईश्वर कोळी,तलाठी अंजाळे शरद सूर्यवंशी,तलाठी दहिगाव विलास नागरे,तलाठी डो.कठोरा वसीम तडवी,तलाठी टाकरखेडा उमेश बाभुळकर,तलाठी कोळवद संदीप गोसावी हजर होऊन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा करण्यास मदत केली.
मनवेल परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने केले जमा
सोमवार, ऑगस्ट २८, २०२३