शिरसाळा मारुती दर्शनास गेलेल्या सावदा येथिल दोघे तरुण अपघातात ठार!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे




सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाळ्यात कायमचे रहिवासी तरुण बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी आज दि. २६ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना बहर्डी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सख्या दोघे चुलत भाऊ ठार झाले.[ads id="ads1"] 

याबाबत अधिक माहिती अशी की,जागृत हनुमान मंदीर शिरसाळा येथे सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाडा परिसरातील दोन तरुण दर्शनासाठी जात असताना बोहर्डी गावा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू झाला.[ads id="ads2"] 

  तर लखन कुंभार याचा भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले दोघे तरुण मोलमजुरी करून आपल्याला कुटुंबाचे उद्धार निर्वाह करणारे व आधार होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : रावेर विधानसभा,लोकसभा सदस्यांचे 'स्वप्न' पाहणारे राजकीय भूतकाळ,वर्तमानकाळ भविष्यकाळाचा विचार करणार का..?

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!