भुसावळ ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील शीलरत्न बुद्ध विहार चांदमाळी चाळ येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणीची त्रैमासिक सभा उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा शाखा पूर्वचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे होते. बैठकीमध्ये काही ठळक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये केंद्राकडून आलेल्या आदेशाप्रमाणे महिलांची स्वतंत्र जिल्हा शाखेची निर्मिती करण्यासाठीची चर्चा करण्यात आली आणि नियोजन करण्यात आले. [ads id="ads1"]
तसेच केंद्राच्या आदेशाप्रमाणे प्रियंकाताई अहिरे यांची अध्यक्षपदी, माधुरीताई भालेराव यांची सरचिटणीसपदी, तर करुणाताई नरवाडे यांची कोषाध्यक्षपदी संस्थेच्या नियमाप्रमाणे निवड झाली. जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भुसावळ येथील वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे यांची महाराष्ट्र राज्य शाखेच्या संघटक पदी आणि नाशिक विभागाच्या प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे बौद्ध सभासद अभियान अधिक गतिमान करण्यासाठी चर्चा करण्यात येऊन नियोजन करण्यात आले.[ads id="ads2"]
तद्नंतर प्रत्येक तालुक्याच्या निवडीनंतर जिल्हा शाखा व तालुका शाखा यांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याचा ठरावही संमत करण्यात आला. जिल्हा शाखा जळगाव पूर्व च्या महिला विभागाचे विसर्जन करण्यात येऊन महिलांची स्वतंत्र कार्यकारणीतील महत्त्वाच्या पदांची निवड करण्यात आली आणि महिलांच्या पूर्वीच्या पदांवर बी.एस. पवार, संतोष गायकवाड आणि साहेबराव धुंदले यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा : रावेर विधानसभा,लोकसभा सदस्यांचे 'स्वप्न' पाहणारे राजकीय भूतकाळ,वर्तमानकाळ भविष्यकाळाचा विचार करणार का..?
कार्यक्रमाला जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, उपासक उपासिका, तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे सरचिटणीस आनंद ढिवरे यांनी केले.


