"भुसावळ न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी अक्रम खान यांना मिळाली २ दिवसांची पोलीस कोठडी
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या अधम व दुर्योधन प्रवृत्तीच्या पुरुषाने शाळकरी बालिकेचा वाईट हेतूने अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याची घटना करून थेट घटणेच्या दिवसांपासून फरार झाला होता.तसेच सदर प्रकरण उघडकीस होवू नये,यासाठी तारेवरची कसरत करणारे मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान सह २ शिक्षकांविरुद्ध पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून सावदा पोलीसात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता.[ads id="ads1"]
मात्र मुख्य संशयित आरोपी अक्रम खान सह कोणालाही अटक झाली न होती,म्हणून सावदा शहरातील संतप्त महिलेसह पालकांनी ३ दिवसांपूर्वी अधी शाळेत जावून त्यानंतर थेट पोलिस ठाणे गाठून अशा दुर्योधन प्रवृत्तीच्या दोषींना लवकर अटक झालीच पाहिजे असा पवित्रा त्यावेळी मोर्चेकरी महिलांनी घेतला असता एपीआय जालींदर पळे व पोउपनि.विनोद खांडबहाले यांनी [ads id="ads2"] महिलांच्या तीव्र अशा भावना ऐकून घेत आरोपींना लवकर अटक केली जाईल असे दिलेले आश्वासनाची पूर्तता दि.१४ ऑगस्ट रोजी रात्री मुख्य संशयित आरोपी अक्रम खान अमानुल्ला खान यास तपास चक्र फिरवून अटक करून "घडलेली घटनेची गंभीरता लक्षात घेता कायदा व व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होता कामा नये"सबब सदरील संशयित आरोपीला सावदा पोलिस ठाण्यात न ठेवता थेट भूसावळ येथे हलविण्यात आले.यानंतर आजच त्याला भूसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.