https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

ऐनपुर येथे तापी नदीच्या पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



  ऐनपूर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

काल रात्री पासून सूरू असलेल्या संततधार पाऊसा मुळे तापी आणि पूर्णा नदी ओसंडून वाहत असल्या कारणने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणाचे संपुर्ण दरवाजे उघडण्यात आले असून हजारो लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.[ads id="ads1"]

ब-हाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागाबुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे[ads id="ads2"]

ऐनपूर,निंबोल, विटवा व इतर गावात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बॅक वॉटर चे पाणी घरांमध्ये व शेती शिवारात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ऐनपूर येथे भेट देउन महापुराची पाहणी केली.सतंतधार पाऊसाने घरांची पडझड झाली असून पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.रोहिणी खडसे यांनी ऐनपूर वं सुलवाडी येथे पुराची पाहणी करून नागरिकांना धीर दिला तसेच रावेर तहसीलदार यांच्या सोबत दुरध्वनी वरुन  नागरीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्या बाबत चर्चा केली

नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच पुर असताना नदी नाले ओलांडू नये असे रोहिणी खडसे यांनी नागरिकांना आवाहन केल

यावेळी प.स.सदस्य दिपक पाटील,सरपंच अमोल महाजन,निभोंरा सरपंच सचीन महाले,किशोर पाटील,मनोहर तायडे,अरविंद महाजन,अक्षय महाजन, मोहन कचरे,सलमान खान,हैदर अली, शारुख शेख,सरफाराज, सुलवाडी येथील मनोहर कोळी, भूषण कोळी,पंकज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,नागरिक उपस्थीत होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!