धावत्या रेल्वे खाली येऊन एकाने संपवली जीवन यात्रा : रावेर मस्कावद शिवारातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



"सावदा पोलिस ठाण्यात झाली अकस्मात मृत्यूची नोंद"

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मस्कावद शिवारातील ता.रावेर डाऊन रेल्वे लाईन खांब क्र.४६०/२८-३० जवळ एका  ३५ ते ४० या वयोगटातील एका अनोळख्या पुरुषांने महानगरी एक्सप्रेस या धावत्या रेल्वे समोर येऊन स्वतःची जीवन यात्रा संपलेली आहे.[ads id="ads1"]

याबाबत खबर देणार यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे लेखी रिपोर्टाद्वारे रेल्वे कर्मचारी अनिल भास्कर भालेराव यांचे मार्फत खबर दिली की.दि.२४/९/२०२३ रोजी ३-३० मिनीटांनी मला रजनिश कुमार उप स्टेशन प्रबंधक/निंभोरा रेल्वे स्टेशन यांनी त्याचे फोनवरुन कळविले की, सावदा रेल्वे स्टेशन जवळ महानगरी एक्सप्रेस डाउन ट्रेन २२१७७ मधिल ड्रायव्हर यांनी डाउन रेल्वे लाईन खंबा क्र.४६०/२८-३० जवळ एक इसम हा गाडीचे समोर आल्याने त्यास हॉर्न दिल्यावर देखील तो न हटल्याने गाडी खाली आला आहे. [ads id="ads2"]

    म्हणुन स्टेशन मास्टर सावदा रेल्वे स्टेशन यांनी त्यांचे PWI रेल्वे इंजी.डिपार्टमेंट यांना कळवून त्यांचे मार्फत ट्रॅकमन खात्री करणे साठी पाठविले असता एक अनोळखी पुरुष हा मयत स्थीतीत मिळुन आला आहे वगैरे मजकुराचा लेखी रिपोर्ट सादर केल्याने यावरून सावदा पो.स्टेला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन अ.मृ.चा पुढील तपास हा वरीष्ठांचे आदेशाने पोलीस उप-निरीक्षक श्री.अनवर तडवी यांचे कडेस देण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!