गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सावद्यात ईद-मिलादचा जुलूस:मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- येत्या गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक व जैन धर्मियांचे पर्युषण पर्वाची सांगता सह मुस्लिम बांधवांचा ईद-मिलादची मिरवणूक असे तिघे सण उत्सव एकच दिवशी म्हणजे दि.२८ सप्टेंबर रोजी येत असून,जातीय सलोखा आबादीत राहीला पाहिजे या अनुषंगाने शहरातील मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मांच्या धार्मिक भावनेचा आदर करून सावदा शहरातील जामा मशीद ट्रस्ट व समस्त मुस्लीम समाज बांधवांनी सामोहिक चर्चा करून असा निर्णय घेतला की, सालाबाद प्रमाणे तारखेनुसार जुलूस काढून साजरा केला जाणारा ईद-ए-मिलादचा हा सण दि.२८ सप्टेंबर ऐैवजी म्हणजे ज्या दिवशी हिंदु समाजाचा गणेशोत्सवाचा गणपती विसर्जन मिरवणूक येत आहे.[ads id="ads1"]

   व तसेच जैन धर्मीयांचे पर्युषण पर्वाची सांगता मिरवणुक देखील काढण्यात येते आहे.तसेच हे सण आपापल्या धर्मातील प्रत्येकासाठी पवीत्र असल्याने सावदा शहरात हिंदु मुस्लीम एकता टिकून राहावी तसेच शहरात बंधुभाव टिकुन राहावा,आणि सर्वत्र सामाजीक ऐक्य आबाधीत ठेवण्यासाठी मदत व्हावी या दृष्टीने सावदा शहरातील मुस्लीम सामजातील लोकांनी हिंदु धर्मीयांच्या धार्मीक भावनेचा आदर करून त्यादिवशी ईद-ए-मिलाद निमीत्त काढण्यात येणारा जुलुस दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी न काढता ईदचे दुस-या दिवशी म्हणजे दि.२९ सप्टेंबर रोजी (शुक्रवार)च्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून काढण्यात येईल.असा सुंदर व चांगला संदेश देणारा निर्णय लोकभावनेतुन घेतला आहे.[ads id="ads2"]

  व त्याव्दारे सर्व धर्मीयांनी एकमेकांना अशाच प्रकारचे सहकार्य करून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावावी असा संदेश दिला आहे.तरी शहरातील मुस्लिम बांधवांनी सदरील घेतलेला निर्णय सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांना दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी.११ वा.समक्ष भेटून कळविला,या प्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पीएसआय विनोद खांडबहाले सह शहराची जामा मस्जिदचे ट्रस्ट,नगीना मस्जिद ट्रस्ट,गोसिया मस्जिद ट्रस्ट, व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!