रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी रावेर तालुक्यातील निंबोल या गावात ग्रामपंचायत मध्ये दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजेला निंभोरा पोलीस स्टेशनचे(PSI)पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शना - खाली येणाऱ्या सणानिमित्त शांतता आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये गणपती उत्सव पोळा आणि ईद-ए-मिलाद या सणासंदर्भात पोलीस निरीक्षक माननीय धुमाळ साहेब पुढे म्हणाले की येणाऱ्या गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये परमिशन घेऊन तसेच मिरवणुकी संदर्भात तसे काही ढोल ताशांचा अर्ज लवकरात लवकर सादर करावा. तसेच गणपती उत्सव पोळा आणि ईद-ए-मिलाद या सणांमध्ये कोणाला त्रास होणार नाही या संदर्भात शांततेचे वातावरण निर्माण करावे तसेच सक्तीचे पालन सर्वांनी करावे अशा सूचना यावेळी (PSI) पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांनी सांगितले. त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब, गोपनीय शाखा ठाणे अंमलदार अमोल वाघ, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी, सदस्य ईश्वर भिल्ल, पोलीस पाटील योगेश पाटील, तसेच गावातील इतर मान्यवर, मोठ्या संख्येने ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते.
ग्रामपंचायत निंबोल येथे शांतता आढावा बैठक संपन्न
रविवार, सप्टेंबर १०, २०२३