ऐनपूर महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर ( विनोद हरी कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील ऐनपूर येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते. तसेच माजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील व डॉ. एस. बी. पाटील तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व महाविद्यालयातील प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.[ads id="ads1"]

   मेरी माटी मेरा देश ही संकल्पना राबविताना प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच उपस्थित मान्यवरांनी अमृत कलश यामध्ये माती टाकून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविकेमध्ये त्यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाविषयीची माहिती विषद केली. [ads id="ads2"]

  अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आजचा तरुण हा उद्याचा भारत आहे असे सांगून सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. विद्यार्थी प्रतिनिधी कु. दीपाशा  गुरव हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!