धरणगावात औ.प्र. संस्थेतर्फे रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

धरणगावात औ.प्र. संस्थेतर्फे रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..

🟥"रन फॉर स्किल" स्पर्धेत स्पर्धक धावणार ; प्रा.नवनीत चव्हाण

धरणगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने धरणगाव येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता 'पी.एम. रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]

   रविवारी होत असलेल्या औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार आहेत. १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारलेले नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी स. ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तेथून परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत असणार आहे. [ads id="ads2"]

  मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी दिलीप वाघ सर, (९४०३५५००१७) यांच्याशी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण व प्र. एम.ए. मराठे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!