"संस्थापक अध्यक्ष ॲड.कैलास शेळके यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती"
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- सावदा येथील शासकीय विश्रामगृहात दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४-३० वाजता महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष ॲड.कैलास शेळके भुसावळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समितीची बैठक घेण्यात आली.[ads id="ads1"]
या बैठकीत मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष जीवन तायडे(देवा भाऊ)यांनी या समितीचे ध्याय धोरण,व कार्यपद्धती बाबत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सलीम पिंजारी फैजपूर, जिल्हा उपाध्यक्ष जाकीर शेख हिंगण,महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता बेडांळे फैजपूर व महिला यावल तालुका अध्यक्ष म्हणून बबीता तडवी पारसाळा,यावल तालुका अध्यक्ष पंकज कोडी हिंगोणा,महिला यावल तालुका उपाध्यक्ष हिना शेख रहीम कींगाव,यावल तालुका उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,सचिव जावेद तडवी कोरपावली,रोशन तडवी पारसाळा सह रावेर तालुका उपाध्यक्षपदी युसुफ शहा व सावदा शहर अध्यक्ष म्हणून फरीद शेख यांची नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads2"]
असून,यावेळी जिल्हाध्यक्ष जीवन तायडे यांनी या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले.याप्रसंगी महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष ॲड.कैलास शेळके व ॲड.प्रशांत जाधव यांनी सर्व रावेर यावल तालुक्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


