रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक बलवाडी येथे संध्याकाळी ६ . वाजता वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, तालुका सचिव कांतीलाल गाढे, हे प्रमुख पाहुणे असून जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग हे मार्गदर्शन करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तळागाळातील लोकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे म्हणून मी या पक्षात काम करत आहे . तालुका सरचिटणीस हे म्हणाले की आपण दुसऱ्या पक्षात काम करण्यापेक्षा आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या पक्षात म्हणजे वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्वांनी काम केलं पाहिजे आणि पक्ष वाढविला पाहिजे. असे ते म्हणाले.[ads id="ads1"]
अध्यक्षीय भाषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असून आंबेडकर चळवळीला पुढे नेणारा पक्ष आहे. स्वयंघोषित नेते बरेच झाले परंतु त्यांनी स्वतःची खडगी भरणे एवढेच काम केले त्यांना समाजाशी कोणत्याच प्रकारचे घेणे देणे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर हे चालवीत आहे . कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होते ते साकार करू शकतात एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे म्हणून तमाम बौद्ध समाजातील एसटी, ओबीसी या समाजाने श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर यांच्यासोबत काम केले पाहिजे तुम्हाला आणि आम्हाला तेच न्याय देऊ शकतात आणि सत्तेमध्ये बसू शकतात. असे अध्यक्ष भाषणामध्ये बाळू शिरतुरे हे म्हणाले.[ads id="ads2"]
या बैठकीला विक्रांत तायडे दिनेश महाजन, सावंत ढिवरे ,साजन दाटे, अविनाश शिरतुरे, गौतम साळुंखे, दीपक तायडे, कुणाल तायडे, अजय तायडे, दौलत अडांगळे ,जितेंद्र तायडे, अक्षय निकम ,राहुल तायडे ,विनोद थाटे, दिलीप तायडे, रोहित तायडे, शुभम तायडे . या बैठकीला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले तर आभार कैलास तायडे यांनी मानले .


