सावदा येथे शांतता समिती बैठकीमध्ये संवाद
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे पोलिस स्टेशनच्या वतीने येत्या गणेश उत्सव,ईद-ए-मिलाद सह जैन धर्मियांचे पर्युषण पर्वाची सांगता मिरवणूक हे एकच दिवशी येत आहेत,या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या विशेष उपस्थितीत दि.२० सप्टेंबर रोजी दु.४ वा.सावद्यात उद्योजक बाबू सेठ यांच्या रावेर रोडवरील जैहरा मॅरेज हॉलमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली.[ads id="ads1"]
याबैठकीत अध्यात्मिक गुरु महामंडलेश्वर जनार्दन महाराज फैजपूर,सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्ती ईश्वरदास महाराज, जामा मस्जिदचे(मुतवल्ली)शेख शरीफ भाई सह डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे, राजकुमार शिंदे, प्रांत अधिकारी कैलास कडलग,तहसीलदार बंडू कापसे,मुख्याधिकारी किशोर चव्हाण,पीडब्ल्यूडी अभियंता व्ही के तायडे,वीज वितरणचे उपअभियंता जे.एच लढे, एपीआय जालिंदर पळे,निलेश वाघ,पीएसआय विनोद खांडबहाले,अन्वर तडवी आणि सावदा व परिसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य,मुस्लिम पंच ट्रस्ट,पोलीस पाटील सह प्रतिष्ठात हिंदू-मुस्लीम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads2"]
तसेच आपल्या एखाद्या चुकीमुळे संपूर्ण गाव,परिसर,शहराचे वातावरण दूषित करू नका.गणेश उत्सवाचा व गणेश विसर्जन मिरवणुकीचा कुटुंबासह आनंद घ्या,सर्वांनी आपापले सण,उत्सव कायद्याचा चौकटीत राहून आनंदाने साजरे करा.देवाधर्माच्या नावावर काहीही चुकीचे करू नका,असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
"सण,उत्सव फक्त समाजच नव्हे तर देश जोडतात" - महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज
महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी,उत्सवांना गालबोट लागू नये.एकमेकांच्या श्रद्धेचा आदर व्हावा.सण,उत्सव फक्त समाजच नव्हे तर देश जोडतात, असे अध्यात्मिक पद्धतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की एकमेकांनी एकमेकांचे धर्माचा व भावनेचा आदर करणे आवश्यक आहे, मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा निर्णयाचे देखील त्यांनी कौतुक केले.यानंतर प्रांत अधिकारी कैलास कडलग, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एपीआय जालिंदर पळे यांनी केले.बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर खड्डे असल्याचा मुद्दा मांडला.पण, सार्वजनिक बांधकामने हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने त्यांच्याशी बोलून मार्ग काढू असे सांगितले.


