यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी) : अतिदुर्गम भागातील आश्रमशाळातील शासनाने सुरू केलेल्या शिक्षक क्षमता चाचणी घेण्यात येत आहे. याला आदिवासी कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून या शासन निर्णयाचा आदीवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्रच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. असे निवेदन संघटनेच्या माध्यमातून यावल प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांना देण्यात आले.
५ सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी आदिवासी विकास विभागाने उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देणे आवश्यक असतांना ही साधे शिक्षक दिनाचे आयोजन करण्याचे सौजन्य आदिवासी विभागाने दाखवले नाही. आज देखील जिल्ह्यातील ८oटक्के विद्यार्थी हे शाळांच्या खोल्यांमध्ये झोपताहेत, जवळपास ३० टक्के मुली देखील अजुन ही वर्गखोल्यांमध्ये राहतात. संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केवळ १० ते १२ अद्यावत शाळा इमारती झालेल्या असुन तेथे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी संडास आणी बाथरूमची पुरेशी सुविद्या नाही. या सर्व बाबींचा शिक्षणावर, आरोग्यावर परिणाम होणार असल्याची परिस्थिती असतांना देखिल आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलुन सकाळी ८.४५ वाजता सुरू करण्याचे नविन आदेश जाहिर केले.[ads id="ads1"]
महाराष्ट्रातील शालांत परिक्षामधील दहावी आणि बारावीचे निकाल देखील समाधानकारक लागले आहेत., कला, क्रिडा संगणक शिक्षकाची शेकडो पदे रीक्त असतांना तसेच अद्याप अनेक शाळावरील विद्यार्थ्याना शाळा गणवेश, पाठप पुस्तके यासारख्या महत्वाच्या बाबींचा पुरवठा झाला नसतांना त्याकडे दुर्लक्ष करून शिशकाची क्षमता चाचणी घेण्याकडे लक्ष केन्द्रीत करणे यावरून केवळ कर्मचाऱ्यांना जेरीस आणणे हाच एकमेव हेतु असल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads2"]
आदिवासी विकास विभाग सुडबुद्धीने कर्मचाऱ्यांच्या विरोधात शालेय वेळापत्रक बदलणे, शिक्षकांची क्षमता चाचण्या घेणे, निकालावरून वेतनवाढी रोखणे, असे वेगवेगळे प्रतिबंधाध्तमक उपाययोजुन सत्तेच्या जोरावर कर्मचाऱ्यांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण केली जात आहे. कर्मचाऱ्यांची बदनामी करून शासनाने अपमानित करण्याचे व खाजगीकरणाचे हे षडयंत्र सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या १७ सप्टेंबर २o२३ ची व नंतरच्या सर्व क्षमता चाचणी परीक्षेवर यावल प्रकल्पातील सर्व शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक कर्मचारी बहीष्कार टाकत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर आदिवासी विकास विभागकर्मचारी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष प्रशांत बोदवडे, संघटनेचे महिला विभागीय उपाध्यक्ष अलका सरदार, एच. डी. पाटील, एम. आर. तडवी , एम डी पिंगळे, पी बी सेकोकारे, के पी ठाकरे , एल आर पवार, आर एस पाटील, एन एम गवारे, डी एस लेंडाळे, डी एस राणे , व्ही टी राठोड , व्ही एस बनकर, जे आर कंखरे , के एमहाजन यांच्या स्वाक्षरी आहे .