तापी नदीच्या पुराच्या बॅक वाटरच्या पाण्यामुळे ऐनपुर-निंबोल गावाचा संपर्क तुटला; पुनर्वसनाचा प्रश्न कायमच

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून दोन दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस सुरू झाला मात्र अचानक काल मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने तापी नदीला पूर आला आहे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे ऐनपुर येथील नदी नाले बॅक वाटर ने भरून गेले आहे तर ऐनपुर निंबोल या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.[ads id="ads1"]

    सविस्तर वृत्त असे की,मध्यरात्री  पासून पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी आणि बॅक वाटर मुळे नदी नाले व ऐनपुर रस्ता जलमय झाल्याने या दोन गावांचा संपर्क तुटला आहे विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने ऐनपुर गावाचे आठवडे बाजार असल्याने या बाजारात येणाऱ्या बहुतेक विक्रेते आणि निंबोल, विटवे तसेच लहान मोठ्या खेड्यातील लोकांना याच रस्त्याने यावे लागते या कारणाने या विक्रेत्या आणि बाजारात येणाऱ्या बाजारकरूना(खरेदीदाराना) पर्यायी मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत त्यांना कमालीची कसरत करावी लागणार आहे.[ads id="ads2"]

तसेच हतनूर बॅक वाटरचे पाणी व पावसाचे पाणी सुरूच असल्याने त्याच रस्त्याने रहिवास असलेल्या काही पावरा आदिवासी बांधवांना,तसेच या वाढत असलेल्या बॅक वाटरच्या पाण्याच्या काही अंतरावरच बऱ्याच लोकांचा रहिवास आहे. ही गंभीर समस्या प्रशासना समोर आहे.

*घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमच*

पावसाळ्यात सतत कमी जास्त पाऊस पडल्याने हतनूर बॅक वाटरचे पाणी वाढून नदी काठी रहिवास असलेल्या लोकांना याचा धोका निर्माण होतो तसेच या समस्येसाठी ऐनपुर पुनर्वसन समिती मार्फत २०१६ साली पासून ते अद्यापपर्यंत वेळोवेळी विविध असे निवेदन, आंदोलन,भूमिगत आंदोलन हे करण्यात येत आहे तरी प्रशासना कडून कोणतेही ठोस अशी भूमिका होत नसल्याचे समजते.अश्या समस्येचा धोका उद्भवल्यास यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न मात्र ही परिस्थिती बघून निर्माण होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!