ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. वैष्णव हे होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासेयोचे विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जे. पी. नेहेतेहे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटीलयांनी केले.[ads id="ads1"]
प्रा. डॉ. जे. पी. नेहेतेयांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्ट व इतिहास समजावून सांगितला. त्यांनी विद्यार्थ्यांना रासेयोच्या बोधचिन्हांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांना स्वत:चे व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने घडविता येते. तसेच विद्यार्थ्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडवून तरुणांमध्ये सामाजिक बाधीलकीची जाण निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करीत असते असेही त्यांनी सांगितले. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी अध्यक्षीय भाषणात स्वयंसेवकांना रासेयो स्थापना दिवसाच्या शुभेछा देऊन राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव व देशाप्रती भक्ती निर्माण होत असते.[ads id="ads2"]
कोणालाही मदत करतांना मनामध्ये कोरडी सहानुभूती कामाची नाही तर त्या सहानुभूतीमध्ये प्रेमाचा, मनाचा ओलावा असला पाहिजे आणि हा ओलावा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील यांनी तर आभारप्रदर्शन रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी दिपाशा गुरव यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालायातील सर्व प्राध्यापक वृंद व प्रध्यापाकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला तसेच रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.