ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; रावेर तालुक्यातही 13 ग्रामपंचायतीची होणार "या दिवशी" सार्वत्रिक निवडणूक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूका ; १२८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका

रावेर तालुक्यात 13 सार्वत्रिक तर 13 पोट निवडणूक

आचारसंहिता लागू

रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच २०६८ ग्रामपंचायतीमधील २९५० सदस्य पदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १२८ रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.[ads id="ads1"]

रावेर तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची मरगळ यामुळे झटकून पडणार आहे रावेर तालुक्यात 13 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका तेरा पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती रावेर निवडणूक सूत्रांनी दिली आहे

रावेर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक पुढीलप्रमाणे

कोळदा, खिरवड ,जिन्सी तासखेडा ,दोधे, रेभोटा, नेहते मोरगावखुर्द, सहस्रलिंग -लाल माती मस्कावद खुर्द, रायपूर ,कोचूर खुर्द,सिंगत या गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच पोटनिवडणूक होणार आहे

या गावांमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूक 2023

वाघोदा खुर्द, मांगी, चुनवाडे चिनावल ,उटखेडा, कळमोदाशिंगाडी- भामलवाडी, खिर्डी बुद्रुक, पातोंडी बोहर्डे ,थेरोळे, विटवे ,आभोडा खुर्द- बुद्रुक रोझोदा, आंदलवाडी या गावांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.[ads id="ads2"]

आचारसंहिता लागू

सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

२५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!