२० ते २५ संशयित पोलिसांच्या ताब्यात : मोठी खळबळ आणि पोलिसांचे कौतुक
यावल (सुरेश पाटील) यावल शहरासह परिसरात दुचाकी वाहने बेकायदा खरेदी विक्री किंवा चोरीचे आहे किंवा कसे..? नवीन वाहने कमी किमतीत विकणे तसेच शेती साहित्य चोरून विक्री करणाऱ्या एकूण २० ते २५ संशयीतांना यावल पोलिसांनी चौकशी व कारवाई साठी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ताब्यात घेऊन कायदेशीर रित्या चौकशीचे श्राद्ध केल्याने संपूर्ण यावल शहरात सर्व स्तरात मोठी खळबळ उडाली आणि या कारवाईबाबत यावल शहरातील अनेकांनी यावल पोलीस स्टेशनला मोठी गर्दी करत पोलिसांचे कौतुक केले.[ads id="ads1"]
यावल शहरातून गेल्या दोन वर्षात काहींच्या मोटरसायकली व शेती साहित्य चोरीस गेल्याच्या नोंदी यावल पोलीस स्टेशनला आहेत.काही मोटरसायकली विना क्रमांकाच्या पासिंग न केलेल्या बेकायदेशीर रित्या विक्री करण्यात आलेल्या असल्याची तसेच शेती साहित्य ( ट्रॅक्टर रोटर व्हिटर )चोरून खरेदी विक्री करणाऱ्यांची गुप्त माहिती यावल पोलिसांना मिळाल्याने यावल पोलिसांनी आज शनिवार दि. 14 ऑक्टोंबर 2023 रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी यावल शहरातील २० ते २५ संशयतांना चौकशी व कार्यवाहीसाठी ताब्यात घेऊन कारवाई सुरू केल्याने यावल शहरासह परिसरात समाजात राजकारणात मोठी खळबळ उडाली.[ads id="ads2"]
ही कारवाई केल्याने यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याप्रमाणे यावल शहरातील अनेक दुचाकी,चार चाकी आणि बांधकाम क्षेत्रातील काही वाहनांची चौकशी केल्यास बेकायदा खरेदी विक्रीचे व्यवहार व चोरट्यांचे मोठे रॅकेट तसेच अवैध सावकारीतून ताब्यात घेतलेली वाहने उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात असून याबाबत यावल पोलिसांचे दोन-तीन पथक वेगवेगळ्या भागात चौकशी व तपास करण्यासाठी रवाना झाले असल्याचे सुद्धा समजले तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.