यावल(सुरेश पाटील) : यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महसूल विभागाने नवरात्रोत्सवाचे निमित्त सादत ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून महिला मतदारांमध्ये जनजागृती केली.[ads id="ads1"]
काल शुक्रवार दि.२०ऑक्टोबर २०२३ रोजी यावल तहसील कार्यालयातर्फे आयोजित नवरात्रोत्सवात महिला मतदार जनजागृती या विषयावर एकांकिका,पथनाट्य आणि उखाणा स्पर्धा घेण्यात आल्या तहसील कार्यालयातील तलाठी आणि सरस्वती महाविद्यालय यावल येथील विद्यार्थी आणि शिक्षक / शिक्षकेतर गुरुजन यांच्या तर्फे ठीक-ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.[ads id="ads2"]
तसेच कला वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थी यांनी देखील पथनाट्य व एकांकिका सादर केली.महिला मतदार जनजागृती पथनाट्य,एकांकिका बघण्यासाठी सर्व स्तरातून मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली.